बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 10 हजार पदांसाठी महाभरती 2023

Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 10 हजार पदांसाठी मोठी महाभर्ती प्रक्रिया राबविण्यात मार्ग अखेर मोकळा झालेला आहे .कोरोना महामारीमुळे पालिकेमध्ये 2017 पासुन पदभरती प्रक्रिया रखडलेली होती .शासनाच्या नविन अध्यादेशानुसार महानगरपालिकेमधील पदभरती बाबत पालिका प्रशासनाकडुन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहेत .

या परिपत्रकामध्ये पालिकेतील मंजुर पदे , रिक्त पदे तसेच भरावयाची पदे नमुद करण्यात आलेली आहेत .यामध्ये वर्ग ब , क, ड संवर्गातील तब्बल 10,000 पदे रिक्त आहेत .यापैकी 1600 पदे हे लिपिकांच्या आहेत .राज्य शासनाच्या धर्तीवर पालिकेतील पदभरती ह्या टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातुन राबविण्यात येणार आहेत .सध्या पालिका प्रशासनाकडुन पदभरतीचे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत . यामुळे आगामी दीड ते दोन महिन्यांमध्ये पदभरती प्रक्रिया पुर्ण होणे अपेक्षित आहे .

यामध्ये प्रामुख्याने सुरक्षा रक्षक , शिपाई , माळी , उद्यान निरीक्षक ,लिपिक , निरीक्षक , अग्निक्षमन जवान त्याचबरोबर शिक्षक , स्टेनोग्राफर , इंजिनिअर , चालक , पेंटर , कारपेंटर , इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत .कोराना प्रसंगापासुन पालिकेमध्ये अद्यापर्यंत कोणत्याही पदांकरीता नियमित पद भरती करण्यात आली नाही . परंतु आता प्रशानांने दिलेल्या आदेशान्वये सदरची पदे ही नियमित वेतनश्रेणीवर भरण्यात येणार आहेत .

यामुळे सुशिक्षित बेराजगार तरुणांना पालिका प्रशासनांमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

Leave a Comment