Gold Silver Price : महाशिवरात्रीच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण! तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे दर जाणून घ्या !

Spread the love

मागील काही दिवसांपासूनच सोने-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ आपल्याला दिसून आलेली होती. मात्र या आठवड्यातच सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सोने-चांदीचे दर पूर्णपणे घसरले होते. आजही सोन्याचा तोच दर असून चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आता सोने चांदी खरेदी करण्याची ही एक सुवर्णसंधी आपल्यासमोर आलेली आहे. महाशिवरात्रीच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. गुड रिटर्नस या वेबसाईटच्या माध्यमातून जर तुम्ही सोने-चांदीची खरेदी केली तर तुम्हाला 22 कॅरेट सोने दहा ग्राम साठी 52 हजार रुपयात मिळेल. या शिवाय 24 कॅरेट सोने दहा ग्रॅम साठी 57 हजार रुपयात मिळेल. आजचा दहा ग्रॅम चांदीचा भाव हा 700 रुपये इतका आहे.

देशामधील काही प्रमुख शहर मधील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचे बाजारभाव

१) चेन्नई – 58,140 रुपये

२) दिल्ली – 57,310 रुपये

३) हैदराबाद – 57,240 रुपये

४) कोलकत्ता – 57,240 रुपये

५) लखनऊ – 57,310 रुपये

६) मुंबई – 57,160 रुपये

७) पूणे – 57,160 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता तपासून घेण्यासाठी आयएसओ मानांकन हॉलमार्क दिले जाते. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेट सोन्यावर 958, यासोबतच 22 कॅरेट सोन्यावर 916 आणि मित्रांनो 21 कॅरेट सोन्यावर 875 याशिवाय अठरा कॅरेट सोन्यावर 750 असे मार्क केले जाते.

जास्त करून सोने हे 22 कॅरेट मध्येच विकले जाते. काही लोक अठरा कॅरेट देखील वापरतात. सोने हे 24 कॅरेट पेक्षा जास्त देखील विकले जात आहे. जितके जास्त कॅरेट असेल तितकी शुद्धता सोन्यात असते.

24 कॅरेट सोन्याची शुद्धता हे 99.9% असते 22 कॅरेट सोन्याचे शुद्धता ही अंदाजे 91 टक्के असते 22 कॅरेट सोन्यामध्ये तांबे चांदी जस्त यांसारख्या इतर विविध धातूंचा नऊ टक्के समावेश केलेला असतो. 24 कॅरेट सोने हे शुद्ध असते पण त्याचे दागिने अजिबात बनवता येत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त दुकानदार आहे 22 कॅरेट सोन्याची खरेदी करतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोन्याची खरेदी करत असताना नागरिकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेणे गरजेचे आहे. हॉलमार्क चे चिन्ह पाहिल्यानंतरच सोन्याची खरेदी करावी. सोन्याची शासकीय हमी देखील असते. म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड लिमिटेड ही हॉलमार्क ठरवत असते…

Leave a Comment