महाराष्ट्र राज्य शासन सेवेत ग्रामसेवक पदांच्या तब्बल 3487 जागेसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .राज्यांमध्ये सुमारे 4500+ ग्रामसेवक पदांच्या जागा रिक्त आहे . यामुळे अनेक ग्रामसेवकांना दोन – तिन ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार दिला असल्याने कामाचा मोठा ताण निर्माा होत आहे . यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत्तमहोत्सवा निमित्त 75,000 हजार जागेवर महाभरती प्रकिया राबविण्यात येणार आहेत .
यापैकी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक पदांच्या सुमारे 3,487 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .ग्रामसेवक हे पद प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवर कार्यरत कर्मचारी असुन ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो .जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमबजावणी ग्रामसेवक गावामध्ये करत असतो . ग्रामसेवक हे पद विकास कामामध्ये अत्यंम मोठी व महत्वाची भुमिका बजावत असल्याने सदर रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणर आहेत .
पात्रता – ग्रामसेवक पदांकरीता अर्ज करण्याकरीता उमेदवारांने 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापिठातुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .या अगोदर 12 वी मध्ये 60 टक्के गुण असणारे उमेदवार अर्ज करु शकत होते , परंतु यामध्ये आता बदल करुन पदवी उत्तीर्ण उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे .
वेतनश्रेणी – ग्रामसेवक या पदांवर नियुक्त झाल्यास प्रथम 3 वर्षे हे परिवेक्षाधिन कालावधी म्हणुन ग्राह्य धरले जातात . या कालावधीमध्ये ग्रामसेवक पदांकरीता 6000/- प्रतिमहा मानधन दिले जात होते आता यामध्ये वाढ करुन 15,000/- मानधन अदा करण्यात येत आहेत . तीन वर्षांचा परिवेक्षाधिन कालावधी पुर्ण झाल्यानंतर ग्रामसेवक पदांस 5200-20200 ग्रेड पे 2400 या वेतनश्रेणीमध्ये वेतन मिळते सातव्या वेतन आयोगानुसार 19900-69900/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन मिळते .
ग्रामसेवकांच्या 3,487 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्याकरीता जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदांना रिक्त पदे व बिंदुनामावली जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत . पदभरती प्रक्रिया ही माहे जानेवारी 2023 पासुन प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे .
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..