Solar Electrification: सौर उर्जेसाठी महावितरण घेणार शेतकऱ्यांकडुन जमिन भाड्याने ! 75,000/- रुपये प्रतिहेक्टर मिळेल भाडे !   

Spread the love

Solar Elecrificarion: राज्यामध्ये जे खेडे विभाग आहे आणि शेती ही भरपूर प्रमाणात आहे अशा ठिकाणी विजेची अडचण ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा ग्रामीण भागात वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा निर्माण करण्यासाठी ‘सौर कृषी वाहिनी योजना ‘ राबवित आहे. यासाठी मुख्यमंत्री 75 रुपयाने शेतकर्‍याकडून जमीन भाड्याने घेऊन तिथे सौर ऊर्जेची निर्मिती करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून 3 हजार शेतीचे 3 सौर ऊर्जीकरण करण्यात येत आहे.

यासाठी 15 एकर जमिनीवरून 4 हजार मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. सौरऊर्जा प्रकल्प: हा सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी जमिनीवर प्रक्रिया करून महावितरणने ऑनलाईन लॅण्ड पोर्टल सुरू केले आहे. शेतकरी असो किंवा आणि कोणताही व्यक्ति असो या सौरऊर्जा प्रकल्पासाठी तो आपली जमीन देऊ शकतो. तसेच सौरऊर्जा प्रकल्पाच्या माहितीसाठी महावितरणच्या जवळच्या 33/11 के.व्ही.उपकेंद्राशी संपर्क साधला जाईल.  प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 30% शेती उपलब्ध आहे. त्यामध्ये वीजनिर्मिती व्हावी यासाठी सौरऊर्जा प्रकल्प चालू करण्यात आला आहे  यासाठी 4 हजार मेगावॉट वीज निर्मितीसाठी शेतकर्‍यांची जमीन ही भाड्याने घेत आहे.

यासाठी 2 हजार 500 उपकेंद्रामधील 3 हजार मेगावॉट क्षमतेच्या 3 हजार शेती ही सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी 15 हजार एकर जमिनीची गरज आहे. सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्दिष्ट:सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ताबडतोब जमीन मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, महावितरणच्या मंडल कार्यालयाचे अधीक्षक, नगर रचना विभागाचे सहायक संचालक  आणि महाऊर्जा या विभागांच्या प्रतिनिधीचा समावेश राहील.

 अर्ज करण्याचे ठिकाण: या सौरऊर्जा प्रकल्पामध्ये जमीन उपलब्ध व्हावी यासाठी शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळावी यासाठी अर्ज करावा आणि शेतकर्‍यांनी आपली जमीन या प्रकल्पासाठी भाड्याने द्यावी असा निर्णय घेण्याचे प्रयत्न चालु आहे. अर्ज करण्यासाठी वेबसाइट:  www.mahadiscom.in/land_bank_portl/index_mr.php. या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे.


Leave a Comment