हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 273 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांत्रिकी अभियंत पदांच्या एकुण 57 जागा , विद्युत अभियंता पदांच्या 16 जागा , उपकरण अभियंता पदांच्या 36 जागा , स्थापत्य अभियंता पदांच्या 18 जागा , रसायन अभियंता पदांच्या 43 जागा , वरिष्ठ अधिकारी पदांच्या 50 जागा , अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी पदांच्या 08 जागा , गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदांच्या 09 जागा , चार्टर्ड अकाउंटंट पदांच्या 16 जागा ,
कायदा अधिकारी पदांच्या 07 जागा , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 04 जागा , महाव्यवस्थापक पदांच्या 01 जागा , कल्याण अधिकारी पदांच्या 01 जागा , माहिती प्रणाली अधिकारी पदांच्या 11 जागा अशा एकुण 273 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता – संबंधित ट्रेड मध्ये अभियांत्रिकी पदविका / पदवी तसेच बी.ई / बी.टेक / संगणक विज्ञान पदवी / पदविका / सामाजिक शाखेतील पदवी / कोणतीही पदवी , पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.hindustanpetroleum.com/careers या संकेतस्थळावर दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !