HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , Apply Now !

Spread the love

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 273 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांत्रिकी अभियंत पदांच्या एकुण 57 जागा , विद्युत अभियंता पदांच्या 16 जागा , उपकरण अभियंता पदांच्या 36 जागा , स्थापत्य अभियंता पदांच्या 18 जागा , रसायन अभियंता पदांच्या 43 जागा , वरिष्ठ अधिकारी पदांच्या 50 जागा , अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी पदांच्या 08 जागा , गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदांच्या 09 जागा , चार्टर्ड अकाउंटंट पदांच्या 16 जागा ,

कायदा अधिकारी पदांच्या 07 जागा , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 04 जागा , महाव्यवस्थापक पदांच्या 01 जागा , कल्याण अधिकारी पदांच्या 01 जागा , माहिती प्रणाली अधिकारी पदांच्या 11 जागा अशा एकुण 273 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : भारतीय मध्य रेल्वे (महाराष्ट्र विभाग) मध्ये तब्बल 2,409 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता – संबंधित ट्रेड मध्ये अभियांत्रिकी पदविका / पदवी तसेच बी.ई / बी.टेक / संगणक विज्ञान पदवी / पदविका / सामाजिक शाखेतील पदवी / कोणतीही पदवी , पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.hindustanpetroleum.com/careers या संकेतस्थळावर दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment