IBPS मार्फत अधिकारी स्केल – 1 पदांच्या तब्बल 1402 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute of Banking Personnel Selection Recruitment For Officers Scale – 1 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
1.आयटी अधिकारी स्केल -1 : आयटी अधिकारी स्केल – 1 पदांच्या 120 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे कॉम्पुटर विज्ञान / संगणक ॲप्लिकेशन / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्टुमेंटेशन मध्ये बी.ई / बी.टेक अथवा पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
2.ॲग्रीकल्चरल फिल्ड अधिकारी ( स्केल -1 ) : सदर पदांच्या एकुण 500 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता कृषी / पशुवैद्यकी विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / पशुपालन /कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / अन्न तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी / शेती व्यवसाय पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
3.राजभाषा अधिकारी स्केल -1 : राजभाषा अधिकारी स्केल – 1 पदांच्या एकुण 41 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ..
4.विधी अधिकारी ( स्केल -1 ) : विधी अधिकारी स्केल -1 पदांच्या एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे LLB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
5.HR /पर्सोनेल अधिकारी स्केल 1 : एचआर / पर्सोनेल अधिकारी स्केल -1 पदांच्या एकुण 31 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर , पर्सनल मॅनेजमेंट / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा / सामाजिक कार्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
6.मार्केटिंग अधिकारी स्केल 1 : मार्केटिंग अधिकारी स्केल – 1 पदांच्या 700 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर , MMS /MBA / PGDBA / PGDBM / PGPM / PGDM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : वरील सर्व पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . तर अनुसुचित जाती / जमाती प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/ या संकेतस्थळावर दिनांक 28 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदांसाठी आवेदन करण्यासाठी जनरल / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता 850/- परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्गाकरीता 175/- परीक्षा / आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !