आयसीआयसीआय ही एक खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असुन ,HDFC बँकेनुंतर कॅपिटलच्या बाबत देशामध्ये दोन क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे . त्याचबरोबर खाजगी बँकेमध्ये सर्वात जास्त कर्मचारी या बँकेमध्ये कार्यरत आहेत . या बँकेमध्ये एकुण 12,360 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .याबाबत आवश्यक शैक्षणिक पात्रता , अर्ज प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
भरती प्रक्रिया –
ICICI बँकेमध्ये , भरती प्रक्रिया प्रत्यक्ष बँकेमार्फत राबविण्यात येत नाही . तर NIIT या खाजगी संस्थामार्फत भरती प्रकिय्रा राबविण्यात येते . यासाठी NIIT संस्थामार्फत उमेदवारांची परिक्षा व मुखातीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येते . निवड झालेल्या उमेदवारांना 6 महिने ते 1 वर्षापर्यंत प्रशिक्षण दिले जाते .प्रशिक्षणामध्ये उमेदवारांना बॅकेतील बँकींग ऑपरेशन शिकविले जाते .यशस्वीरित्या प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष आयसीआयसीआय बँकेत प्लेसमेंट दिले जाते .सर्वप्रथम 6 महिने ऑन रोल ट्रेनिंग दिले जाते . या 6 महिने कालावधी करीता उमेदवारांस 7,000/- रुपये इतके स्टायपेंट दिले जाते .त्यानंतर उमेदवास नियमित वेतनश्रेणी लागु करण्यात येते .यामध्ये सिनियर ऑफिसर पदासाठी 21,100/ – ते 67,800/- ही वेतनश्रेणी लागु करण्यात येते .सिनियर ऑफिसर ग्रपुमध्ये कॅशियर , डेस्क अधिकारी यांचा समावेश असतो .
पदे व आवश्यक पात्रता –
यामध्ये प्रामुख्याने कॅशियर ,बँकिंग आपॅरेशन अधिकारी ,सेल्स अधिकारी , डेप्युटी मॅनेजर ,असिस्टंट ब्राँच मॅनेजर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . या पदांसाठी उमेदवार कोणत्याही पदवीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . ( वाणिज्य , विज्ञान शाखेतील उमेदवारांना प्राधान्य ) तसेच 10 वी ,12 वी मध्ये किमान 50 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे .पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये प्रवेशित उमेदवार देखिल अर्ज करु शकतील .या पदांसाठी 18 ते 24 वयोगटामधील उमेदवाराच अर्ज सादर करु शकतील .
ऑनलाईन आवेदन करण्यासाठी व सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मध्ये विविध गट क आणि ड पदांसाठी नियमित पदभरती , लगेच करा आवेदन !
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !