भारत सरकारच्या मिंट , मुंबई येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारत सरकारच्या मिंट मुंबई येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Government Mint Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 65 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम व पदांची संख्या : यांमध्ये फिटर पदांच्या 24 जागा , टर्नर -04 जागा , अटेडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट ) पदांच्या 11 जागा , मोल्डर पदांच्या 03 जागा, हीट ट्रीटमेंट पदांच्या 02 जागा , फाउंड्रीमन / फर्नेसमन पदांच्या 10 जागा , ब्लॅकस्मिथ पदांच्या 01 जागा , वेल्डर पदांच्या 01 जागा , कारपेंटर पदांच्या 01 जागा , कनिष्ठ कार्यालय सहाय्यक पदांच्या 06 जागा , कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदांच्या 02 जागा असे एकुण 65 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

पात्रता : कनिष्ठ कार्यालय सहाय्यक व कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदांकरीता उमेदवार हा 55 टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर उर्वरित पदांकरीता पदानुसार आवश्यक ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : महिला व बाल विकास विभागामध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://igmmumbai.spmcil.com/en/discover-spmcil/#career या संकेतस्थळावर दि.15 जुन 2023 ते 15 जुलै 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदांरकीता जनरल / ओबीसी उमेदवारांकरीता 600/- रुपये तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 200/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment