महिला व बाल विकास विभागामध्ये अंगणवाडी मदतनीस पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , शैक्षणिक अर्हता तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर पदभार जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदसंख्या / पात्रता : यामध्ये अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 35 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदे ही महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत . सदर पदांकरिता उमेदवार इयत्ता 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा : सदर पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .तर विधवा / अनाथ उमेदवार असल्यास कमाल वय 40 वर्षे असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : भारत सरकारच्या मिंट मुंबई येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया !
नोकरीचे ठिकाण : सदरची पदे ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आहेत . तेथील स्थानिक उमेदवारांस प्राधान्य देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पध्दतीने श्रीगोंदा तहसील कार्यालय ,अहमदनगर जिल्हा या पत्त्यावर दि.23 जून 2023 पूर्वी अर्ज सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !