आपल्या गावामध्ये नोकरीची मोठी संधी  : भारतीय डाक विभाग – महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागेवर ग्रामीण डाकसेवक पदांसाठी मोठी मेगाभरती !

Spread the love

भारतीय डाक विभाग : महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागेवर ग्रामीण डाकसेवक पदांच्या तब्बल 2508 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .सदर पदभरती मध्ये देशात एकुण 40,889 जागेवर पदभरती करण्यात येत असून यापैकी महाराष्ट्र सर्कलमध्ये 2508 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

पदांचे नावे – शाखा व्यवस्थापक ( BPM ) , सहाय्यक शाखा व्यवस्थापक ( ABPM ) , डाकसेवक , मेलगार्ड

पात्रता – उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवारांने मुलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र ( MSCIT / CCC ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी वय 18 वर्षे ते 40 वर्षादरम्याने असणे आवश्यक आहे . यामध्ये मागास प्रवर्ग उमेदवारांना पाच वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

निवड प्रक्रिया – ग्रामीण डाकसेवक पदांकरीता कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नसून , केवळ दहावीच्या गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल .

वेतनश्रेणी – 10,000-14500/- + इतर देय वेतन व भत्ते

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://indiapostgdsonline.cept.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दि.16 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- आवेदन शुल्क म्हणून आकारले जातील , मागास प्रवर्ग / महिला उमेदवारांना आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी / आपल्या गावनिहाय रिक्त जागा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

Apply / जाहीरात पाहा

Leave a Comment