बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 500 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( bank of india is a Public Sector Bank Recruitment for Various Post , Number of Post 500 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | क्रेडिट ऑफिसर | 350 |
| 02. | आयटी ऑफिसर | 150 |
| एकुण पदांची संख्या | 500 |
पात्रता – क्रेडीट ऑफीसर पदाकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर आयटी अधिकारी पदाकरीता उमेदवार हा बी.ई /बी.टेक /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / आयटी पदवी किंवा समकक्ष अर्हता किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC B LEVEL
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 फेब्रुवारी 2023 रोजी 20 वर्षे ते 29 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .मागासवर्गीय उमेदवारांना वयांमध्ये पाच तर इतर मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/boipojan23/ या संकेतस्थळावर दि.25 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 850/- रुपये आवेदन शुल्क तर मागासवर्गीय उमेदवारांना 175/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026