India Post Recruitment 2023 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याकरिता प्रयत्न करत असाल तर आता भारतीय टपाल विभागांमध्ये भरती होण्याची संधी तुमच्यासमोर आली आहे. कारण आता केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध मंडळाच्या अंतर्गत भारताच्या टपाल विभागांमध्ये देशभरात सर्वत्र भरती होणार आहे.
ह्या माध्यमातून आता पोस्ट विभाग पोस्ट विभागांमध्ये असलेल्या एकूण रिक्त 98 हजार पदांसाठी अर्ज मागवत आहे आणि या रिक्त पदांसाठी लवकरच भरती घेण्यात येईल याबाबतची माहिती देखील जारी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 98 हजार पदांसाठी बंपर भरतीची अधिसूचना भारतीय टपाल विभागामार्फत 24 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित होईल आणि ही अधिसूचना एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये प्रकाशित केली जाऊ शकते.
एकूण 98 हजार रिक्त पदे पोस्ट विभागांमध्ये असून या पदांकरिताच भरती भरवण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार 24 डिसेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत रोजगार वाटाघाटी सप्ताहात सर्व मिळून 98 हजार रिक्त पदाकरिता अधिसूचना जारी केली जाईल. एकूण पोस्टमनच्या सर्वाधिक 59 हजार रिक्त जागा आणि त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफ या पोस्टच्या 37 हजार रिक्त जागा व मेल गार्डच्या 1400 रिक्त जागा अशा प्रकारे सर्व मिळून 98 हजार रिक्त पदांकरिता 2023 मध्ये पोस्ट विभागाकडून भरती भरवली जाईल.
अशाप्रकारे अर्ज करा!
भारतीय टपाल विभागांमध्ये एकूण 98 हजार रिक्त पदे असून यामध्ये पोस्टमन, मेल गार्ड, एमटीएस अशी रीक्त पदे आहेत. या पदांकरिता भरती घेतली जाईल. ही भरती नक्की कधी घेतली झाली याची अधिसूचना एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये दाखवली जाईल. भरतीची तारीख फिक्स झाल्यानंतर तुम्ही शासनाच्या indiapost.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
डिपार्टमेंट ऑफ पोस्ट रिक्रुटमेंट या नोकरीची वाट पाहणारे उमेदवार आता indiapost.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून ज्यावेळी भरती सक्रिय होईल त्यावेळी पोस्ट ऑफिस भरती मधील 98 हजार रिक्त पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भरतीमध्ये सहभाग घेणाऱ्या उमेदवारांनी प्रकाशित होणाऱ्या रोजगार बातम्यांवर लक्ष ठेवावे. यासोबतच पोस्ट विभागाच्या वेबसाईटवर देखील लक्ष ठेवून ज्यावेळी अर्जाची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी अर्ज करून घ्यावेत.
- शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !
- पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसन पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 181 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर वायु ( नॉन कॅबॅटंट ) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर अंतर्गत लातुर व बीड येथे विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !