बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये वर्ग – क व वर्ग -ड पदांच्या एकुण 10,000 जागांसाठी पदभरती प्रक्रिया करीता आयुक्तांकडुन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत . महानगरपालिकेमध्ये सध्या 10 हजार पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत . रिक्त पदांपैकी 10 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदभरती प्रक्रिया करीता मुंबई आयुक्ताकडुन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .
परिपत्रकानुसार मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग ब मध्ये एकुण 1230 पदे तर वर्ग क मध्ये 4630 पदे तर उर्वरित पदे ही वर्ग ड मधील असून सदर पदांवर नियमित पद्धतीने पदभरती प्रकिया राबविण्यात येणार आहे .पदभरतीकरीता प्रशासनांकडुन , सुधारित आकृतीबंध , रिक्त जागांची संख्या , बिंदुनामावली तयार करण्याचे कामकाज सुरु आहे .सदरची पदभरती प्रक्रिया ही TCS ,IBPS कंपन्याकडुन राबविण्यात येणार आहेत .यामुळे पदभरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे .
यामध्ये प्रामुख्याने लिपिक , निरीक्षक , नर्स , स्टेनो , शिक्षक , कारपेंटर , चालक , पेंटर , शिपाई , अग्निक्षमन अधिकारी / जवान , उद्यान निरीक्षक , इंजिनिअर ,सफाई कामगार , लेखपाल ,भांडारपाल इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत .सदरचे पदे हे नियमित वेतनश्रेणीवर भरण्यात येणार असल्याने राज्यातील तरुणांना कायमस्वरुपी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
सदर पदभरती प्रक्रिया मध्ये कनिष्ठ लिपिक व डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकुण 1600 जागा रिक्त आहेत ,यामुळे राज्यातील टायपिंग पात्रता उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .सदर पदभरती प्रक्रियेबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे .

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026