India Post : भारतीय डाक विभागमध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

Spread the love

भारतीय डाक विभाग मध्ये विमा प्रतिनिधी पदांच्या जागासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Indian Post Department Recruitment For Insurance Represntive Post , Number of Post vacancy – not Declear ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदाचे नाव – विमा प्रतिनिधी

पात्रता – उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाद्वारे इयत्ता दहावी पास असणे आवश्यक आहे . किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाईल . त्याचबरोबर उमेदवारास संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णत : माहीती असणे आवश्यक आहे . सदर पदास अर्ज करण्याकरीता उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीस दि.31 जानेवारी 2023 रोजी मा. अधिक्षक डाकघर कोल्हापूर विभाग , रमणमळा कोल्हापुर 416003 या पत्त्यावर उपस्थित रहायचे आहे . मुलाखत सकाळी 10.00 वाजता सुरु होणार असून , उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह सदर ठिकाणी उपस्थित रहायचे आहे .

अधिक माहीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment