जलसंपदा विभागांतर्गत गट – क मधील रिक्त पदांच्या 4,075 जागेवर महाभरती ! GR निर्गमित !

Spread the love

जलसंपदा विभाग अंतर्गत गट – क मधील रिक्त पदे भरण्याकरीता प्रादेशिक स्तरावरील निवड समिती गठीत करणेबाबत , राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडुन दि.17.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . जलसंपदा विभागातील 4075 जागेवर भरती प्रक्रिया बाबत निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

शासन सेवेत रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने जलसंपदा विभागातील आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नसल्यामुळे सरळसेवेच्या कोट्यातील 80 टक्के पदे भरण्याबाबतची कार्यवाही दि.15.08.2023 पुर्वी करण्यात येणार आहे .जलसंपदर विभाग अंतर्गत काही मंडळांच्या कार्यक्षेत्रामध्ये 2-3 जिल्हे तर काही मंडळाच्य कार्यक्षेत्रामध्ये संपुर्ण राज्यातील बहुतांश जिल्हे येत असल्यामुळे प्रादेशिक स्तरावरील गट क मधील नामनिर्देशनाने भरावयाच्या पदावरील नियुक्तीसाठी उमदेवाराची निवड करण्याकरीता परिमंडळनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे .

जलसंपदा विभागातील मुख्य अभियंत्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गट – क मधील नामनिर्देशनाने रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भांकित शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार तसेच सेवा प्रवेश नियम , सर्व प्रकारचे आरक्षण इ.संबंधी प्रचलित नियम व आदेश विचारात घेवून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही त्वरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .यामध्ये वर्ग – क संवर्गातील 80 टक्के पदे भरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .

जलसंपदा विभागामध्ये एकुण 4075 जागा रिक्त

जलसंपदा विभागामध्ये सध्या एकुण 4075 जागा रिक्त असून , जलसंपदा विभागाचा वरील नमुद शासन निर्णयान्वये 4075 जागेच्या 80 टक्के जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . याकरीता संबंधित विभागाकडुन रिक्त पदांचा आकृत्तीबंधाची माहीती सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत .

जलसंपदा विभागाचा भरती प्रक्रिया संबंधित दि.17.11.2022 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

पदभरती शासन निर्णय

Leave a Comment