महाराष्ट्र राज्यात कापूस महामंडळ मध्ये विविध साठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

कॉटन महामंडळ इंडिया लिमिटेड मध्ये विविध करिता पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( The Cotton Corporation Of India Ltd, Recruitment For Various Post, Number Of Post Vacancy – 93 ) पदनाम , पदांची संख्या, आवश्यक पात्रता यासंदर्भात सविस्तर पदभरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात..

1.विपणन व्यवस्थापक : विपणन व्यवस्थापक पदांच्या एकूण 06 जागेकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा ॲग्री बिजनेस मॅनेजमेंट (एग्रीकल्चर) विषयांमध्ये एमबीए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

2.खाते व्यवस्थापक : खाते व्यवस्थापक पदांच्या एकूण 06 जागेकरिता पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार हा सी. ए/ सी एम ए/ एमबीए फायनान्स /एमएमएस /एम. कॉम किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : पुणे येथे तब्बल 6,700 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

3.कनिष्ठ व्यापारी एक्झिक्युटिव्ह : कनिष्ठ व्यापारी एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 81 जागेकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार 50% गुणासह बीएससी एग्रीकल्चर अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये मागासवर्गीय / अपंग उमेदवारांकरिता गुणांमध्ये 5 टक्के सूट देण्यात येईल .

वयोमर्यादा : वरील सर्व पदांकरिता उमेदवाराचे वय दिनांक 24 जुलै 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . तर अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची सूट तर इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता व वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले अर्ज https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/84555//Index.html या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 13 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदाकरिता 1500 रुपये तर मागासवर्गीय /माजी सैनिक उमेदवारांकरिता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment