राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अंतर्गत विविध गट ब व क संवर्गातील पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sant Rohidas Leather Industries & Charmakar Development Corporation Ltd . Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये व्यवस्थापक पदांच्या 01 जागा , सहव्यवस्थापक पदांच्या 03 जागा , उपव्यवस्थापक पदांच्या 07 जागा , उच्चलघुलेखक पदांच्या 01 जागा , सहाव्यवस्थापक पदांच्या 05 जागा , सहाय्यक पदांच्या 07 जागा , जिल्हा व्यवस्थापक पदांच्या 30 जागा , लेखापाल पदांच्या 32 जागा , वसुली निरीक्षक पदांच्या 23 जागा अशा एकुण 109 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पदांनुसार वेतनश्रेणी
| पदनाम | वेतनश्रेणी |
| व्यवस्थापक | 67,700-208,700/- |
| सहव्यवस्थापक | 44,900-142,400/- |
| उपव्यवस्थापक | 38,600-122,800/- |
| उच्चलघुलेखक | 35,400-112,800/- |
| सहा.व्यवस्थापक | 29,200-92,300/- |
| सहायक | 25,500-81,100/- |
| जिल्हा व्यवस्थापक | 41,800-132,300/- |
| लेखापाल | 25,500-81,100/- |
| वसुली निरीक्षक | 25,500-81,100/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मा.व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित , मुंबई या पत्त्यावर दिनांक 04 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !