Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !

Spread the love

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन व्यवसायिक संकल्पना घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्ही थोडीफार गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला चांगली कमाई करू शकता व तुमची आर्थिक बाजू बळकट करू शकता. यासोबतच विशेष गोष्ट म्हणजे हा व्यवसाय तुम्ही तुमच्या गावांमध्ये शहरांमध्ये कुठेही सुरू करू शकता.

Business Idea :

जर आता तुम्हाला स्वतःचा एक व्यवसाय, व्यवसाय म्हणजे चांगला असा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आत्ताच तयारीला लागा. कारण तुमच्यासाठी आजची बातमी खास आहे या बातमीमध्ये नवीन व्यवसायाची संकल्पना आम्ही घेऊन आलो आहोत.

तुमच्या आसपास या व्यवसायाची बरेच गिऱ्हाईक आहेत. त्यामुळे हा व्यवसाय आपल्याला कोठेही सुरू करता येतो. या व्यवसायातून जो आपण माल तयार करतो त्याची मार्केटिंग करण्यास कोणता अडथळा येणार नाही. थोड्याफार मार्केटिंग मध्ये हा माल चांगल्या दराने विकला जाऊ शकतो. मित्रांनो आम्ही तुम्हाला त्याच व्यवसाय बद्दल सांगत आहोत. त्या व्यवसायाचे नाव आहे फराळाचा व्यवसाय. ज्याची सुरुवात अगदी कमी खर्चात करता येते. हा व्यवसाय तुम्हाला लवकरात लवकर मोठी कमाई करून देऊ शकतो. मित्रांनो फूड प्रोसेसिंग बद्दल तुम्ही ऐकलेच असेल तरीही थोडक्यात सांगतो.

शेतामधून जो माल पिकवला जातो तो माल जसाच्या तसा मार्केटमध्ये न विकता त्या मालावर प्रक्रिया करून नवीन प्रॉडक्ट तयार केला जातो. शेतमाल मार्केटमध्ये ज्या किमतीने विकला जातो त्याच्यापेक्षा कित्येक पटीने प्रोसेसिंग केलेला माल चांगल्या दराने विकता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी यासोबतच इतर उद्योजक मित्रांनी फूड प्रोसेसिंग सेक्टर मध्ये उतरणे गरजेचे आहे.

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आपल्या देशामध्ये नमकीन पदार्थ लोक खूप आवडीने खातात. त्यामुळे हा व्यवसाय तुमच्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये कोठेही सुरू करू शकता. याचे मार्केट आपल्याला कुठेही बसवता येते. बहुतेक लोक सकाळ सकाळी नाष्टा करत असताना चहा सोबत बिस्किट किंवा स्नॅक्स खातात.

अनेक प्रकारचे नमकीन बाजारामध्ये उपलब्ध आहे. पण तुमच्या नमकीन मध्ये काही विशिष्ट वेगळीच चव असेल आणि त्याची एकदा आवड लोकांना झाली तर तुमच्या मालाला मार्केटमध्ये मोठी किंमत मिळू शकते.

कसे सुरू करावे ?

नमकीन पदार्थ बनवण्याकरिता फ्रायर मशीन, पॅकेजिंग मशीन, सेव मेकिंग मशीन, मिक्सिंग मशीन, वजनाचे यंत्र इत्यादी गोष्टींची आवश्यकता आहे. हा व्यवसाय छोट्या स्वरूपामध्ये देखील सुरू करता येतो. त्यासाठी छोटे दुकान किंवा कारखाना सुरू करण्याकरिता जवळपास 300 चौरस फुटापासून 500 चौरस फुटापर्यंत जागा असावी.

जर कारखान्याच्या स्वरूपात व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी परवाना घ्यावा लागेल. उदाहरणात अन्न परवाना, एम एस एम इ नोंदणी, जीएसटी ची नोंदणी अशा विविध आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील.

कच्च्या मालाची आवश्यकता

हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याचे प्रथम पाऊल म्हणजे कच्चामाल. तर कच्चामालाच्या स्वरूपात आपल्याला बेसन लागेल, तेल लागेल, मैदा मीठ मसाले शेंगदाणे लागतील, यासोबतच मुगडाळ मसूर डाळ इत्यादी गोष्टी लागणार आहेत. यासोबतच कामाचा ताण पडू नये याकरिता एक-दोन कर्मचारी देखील असावेत. म्हणजे काम सोपे होईल. आपल्या कारखान्यांमध्ये किंवा दुकानांमध्ये पाच ते आठ किलोवॅट इतकी वीज जोडावी लागेल.

या व्यवसायातून होणारी कमाई

मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्याकरिता सुरुवातीला कमीत कमी दोन लाख रुपये व जास्तीत जास्त सहा लाख रुपये इतकी गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्ही काही दिवसातच खर्चाच्या सुमारे 20 ते 30 टक्के नफा प्रति महिन्याला कमवू शकता.

Leave a Comment