महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण विभाग मध्ये गट क संवर्गातील 345 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण विभाग मध्ये गट क संवर्गातील 345 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Food Civil Supplies And Consumer Protection Department Recruitment For Class C Post , Number of Post Vacancy – 345 ) महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पुरवठा निरीक्षक गट क पदांच्या विभाग / कार्यालय निहाय रिक्त पदांच्या संख्या पुढीलप्रमाणे आहेत ..

अ.क्रविभाग / कार्यालयपदसंख्या
01.कोकण47
02.पुणे82
03.नाशिक49
04.छत्रपती संभाजीनगर88
05.अमरावती35
06.नागपुर23
 एकुण पदसंख्या324

शैक्षणिक अर्हता : सदर पुरवठा निरीक्षक या पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयांमध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल .

हे पण वाचा : राजपत्रित / अराजपत्रित (गट – ब ) संवर्गातील पदांसाठी महाभरती 2023

02.उच्चस्तर लिपिक ( गट क ) : उच्चस्तर लिपिक पदांच्या 21 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/reg या संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता अराखीव प्रवर्ग उमेदवारांकरीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल , तर माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment