महाराष्ट्र राज्य शासन सेवेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रिया सुरु करण्याचे घोषित केले असून , याकरीता पदभरती वरील निर्बंध काही कालावधी करीता शिथिल करण्यात आले आहेत . यानुसार आता शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देणेबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दि.03 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहीरातींकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधिन दि.25.04.2016 च्या शासन निर्णयात विहीत केलेल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे .
ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधिन दि.25.04.2016 मध्ये विहीत केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहीत केली आहे . अशा पदांसाठी देखिल या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहीत केलेल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देय असणार आहे .
सदर शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी जाहीराती प्रसिद्धी झालेल्या आहेत तथापि अद्यापी उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही , अशा सर्व जाहीरातींसाठी देखिल कमाल वयोमर्यादेतील शिथिलता लागू असणार आहेत .त्यानुसार संबंधित जाहीरातीच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता दिल्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुरेशी मुदतवाढ देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दि.03.03.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..