MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .

Spread the love

MahaTransco : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 493 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राब‍विण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahatranco recruitment for various post , number of post vacancy – 493 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यामध्ये अभियंता अधिक्षक ( स्थापत्य ) कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) , अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) , उप कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) , सहायक अभियंता ( स्थापत्य ) , सहाय्यक महाव्यवस्थापक , वरीष्ठ व्यवस्थापक , व्यवस्थापक , उपव्यवस्थापक …

उच्च विभाग लिपिक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक मुख्य सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी / सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी , कनिष्ठ सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी पदांच्या एकुण 504 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
02.कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )04
03.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )18
04.उप-कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )07
05.सहायक अभियंता ( स्थापत्य )134
06.सहाय्यक महाव्यवस्थापक01
07.वरिष्ठ व्यवस्थापक01
08.व्यवस्थापक ( एफ & ए06
09.उप-व्यवस्थापक ( F & A )26
10.वरिष्ठ लिपिक37
11.कनिष्ठ लिपिक260

एकुण पदांची संख्या
493
 

अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
02.कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )B.E / Equivalent
03.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )B.E / Equivalent
04.उप-कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )B.E / Equivalent
05.सहायक अभियंता ( स्थापत्य )B.E / Equivalent
06.सहाय्यक महाव्यवस्थापकCA / ICWA
07.वरिष्ठ व्यवस्थापकCA/ ICWA
08.व्यवस्थापक ( एफ & एCA/ ICWA
09.उप-व्यवस्थापक ( F & A )CA / ICWA / MBA/ M.COM
10.वरिष्ठ लिपिकB.COM , MSCIT
11.कनिष्ठ लिपिकB.COM, MSCIT

हे पण वाचा : शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 700/- रुपये तर अनुसुचित जाती प्रवर्ग करीता 350/- रुपये तर , उच्च विभाग लिपिक व कनिष्ठ लिपिक पदाकरीता खुला प्रवर्ग करीता 600/- रुपयत तर अनुसुचित जाती प्रवर्ग करीता 300/- रुपये ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.mahatransco.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.05.2025 पर्यंत  अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे ..

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment