अंगणवाडी मेगाभर्ती : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या 8,360 जागेसाठी मेगाभर्ती .

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या एकुण 8,360 जागेसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . राज्यांमध्ये नविन शैक्षणिक धोरण पुढील वर्षांपासुन लागु होणार असल्याने , अंगणवाडी शैक्षणिक दृष्ट्या अधिक सक्षम होणार आहेत .यामुळे राज्यातील अंगणवाडीमध्ये सेविका / मदतनिस पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

नविन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडीचे महत्व –

नविन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडीच्या शिक्षणाला अधिक महत्व देण्यात येणार आहेत , सध्या खाजगी इंग्रजी माध्यमांप्रमाणे LKG , UKG शिक्षण आता अंगणवाडीमध्ये सुरु करण्यात येणार आहे .यामध्ये शिक्षणांचे माध्यम मराठी / इंग्रजी असणार आहेत .अंगणवाडीमध्ये इयत्ता 2 री पर्यंतचे शिक्षण सुरु करण्यात येणार असून , जिल्हा परिषद शाळेला अंगणवाडी जोडण्यात येणार आहेत . यामुळे अंगणवाडी सेविका पदांचे नामकरण देखिल अंगणवाडी शिक्षिका असे होणार आहे .

पात्रता – अंगणवाडी शिक्षिका पदांकरीता – 10 वी उत्तीर्ण , D.ED /B.ED पात्रताधारकांसाठी प्राधान्य देण्यात येईल , तर अंगणवाडी सेविका पदांकरीता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर अंगणवाडी मदतनिस पदाकरीता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

सध्या राज्यातील अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचारी महिला व बाल विकास विभागा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे कामकाज देखिल करत असतात .सध्या अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत .

रिक्त जागांवर रोजंदारी पद्धतीने पदभरती न करता कायम पद्धतीने पदभरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहेत .सध्या राज्य शासन सेवेतील सर्व आस्थापनेवरील  ( जिल्हा परीषद , नगरपालिका , महानगरपालिका ) अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांच्या तब्बल 8,360 जागा रिक्त आहेत . सदर पदांवर लवकरच पदभरती राबविण्यात येणार आहेत .

Leave a Comment