महाराष्ट्र वन विभागांमध्ये वनसेवक / वनमजुर या गट ड संवर्गातील पदांच्या तब्बल 8,446 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याबाबत वन विभाग मार्फत अधिकृत पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , लवकरच सदर पदांवर तात्काळ भरती करण्यात येणार आहेत .
वनसेवक / वनमजुर पदभरतीचे काही मार्गदर्शक तत्वे : सदरची पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत . तसेच सदर पदावरील नियुक्त ही कायम स्वरुपातील राहणार असून पेसा पदभरतीमध्ये सदर पदांना स्थान देण्यात येणार आहेत .
वेतनश्रेणी : सदर पद हे गट ड संवर्गात येत असल्याने , सदर पदांवर नियुक्त उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 15,000-47,600/- या वेतनश्रेणी वेतन व इतर देय वेतन / भत्ते अदा केले जातील .
वनसेवक महाभरती अधिसूचना (PDF) पाहा
आवश्यक शैक्षणिक अर्हता : किमान 10 वी पास तर कमाल 12 वी पास असणे असणे आवश्यक असेल , उच्च अर्हता धारण केले नसल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेत . म्हणजेच कमी शिक्षण झालेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .
पदोन्नतीच्या संधी : वनरक्षक ( गट क ) या पदांवर पदोन्नती देण्याकरीता 25 टक्के पदे हे वनसेवकांमधून पदोन्नती भरण्यात येणार आहेत .
सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी Click Here
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026