महाराष्ट्र गृहविभाग : कारागृह विभाग मध्ये विविध संवर्गातील 2,000 जागांसाठी नव्याने पदभरती शासन निर्णय निर्गमित!

Spread the love

गृहविभाग पदभरती शासन निर्णय : महाराष्ट्र राज्य शासनांच्या कारागृह विभागाच्या अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गात नव्याने 2,000 पदे निर्माण करुन सदर पदांवर पदभरती संदभात राज्य शासनांच्या गृह विभागांकडून दिनांक 06 ऑक्टोंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यांत कारागृह विभागांच्या वर्गीकरणानुसार 9 मध्यवर्ती कारागृहे आहेत , तर जिल्हा कारागृहांची संख्या 28 तर विशेष कारागृहे 01 तर किशोर सुधारालय नाशिक 01 तर महिला कारागृहाची संख्या 01 तर खुली कारागृहे 19 आणि खुली वसाहत आटपाटी 01 असे 60 कारागृहे राज्यात आहेत .गृह विभागांकडून दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी कारागृह विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजुर करण्यात आला आहे . यानुसार 5068 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गातील 2000 नविन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

राजपत्रित गट अ संवार्गतील नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे : यांमध्ये विशेष कारागृह महानिरीक्षक , अधिक्षक , मध्यवर्ती कारागृह , मानसशास्त्रज्ञ , मनोविकृती शास्त्रज्ञ , अशा एकुण 16 पदांचा समावेश आहे .

राजपत्रित गट ब संवर्ग : यांमध्ये उप अधिक्षक मध्यवर्ती कारागृह पदांच्या 07 जागा , वैद्यकीय अधिकारी वर्ग – 2 पदांच्या 09 जागा , तर स्वीय सहाय्यक / प्रशासन अधिकारी पदांच्या 02 जागा अशा एकुण 18 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

सविस्तर महाभरती जाहिरात पाहा

अराजपत्रित गट क संवर्गातील पदे : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी वर्ग – 3 , कार्यालयीन अधिक्षक , तुरुंग अधिकारी श्रेणी 1 , तुरुंग अधिकारी श्रेणी 2 , मिश्रक , वरिष्ठ लिपिक , लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , सुभेदार , हवालदार , कारागृह शिपाई , परिचालक अशा एकुण 1966 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

कारागृह निहाय / पदनिहाय रिक्त पदांची संख्या या संदर्भात सविस्तर पदभरती शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

मेगाभरती शासन निर्णय पाहा

Leave a Comment