महाराष्ट्र राज्य कृषी विभागांमध्ये लिपिक व सहाय्यक अधिक्षक पदांच्या तब्बल 158 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता आवश्यक असणारी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
कृषी विभागाच्या सर्व विभागामध्ये लिपिक पदांच्या एकुण 105 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . यामध्ये छत्रपती संभाजी नगर विभागांमध्ये 11 पदे , पुणे विभाग 13 पदे , ठाणे विभाग 18 पदे , नाशिक विभाग 12 पदे , कोल्हापुर विभाग 14 पदे , नागपूर विभाग 14 पदे , अमरावती विभाग 09 पदे तर लातूर विभागामध्ये 14 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
तर सहाय्यक अधिक्षक पदांच्या एकुण 53 पदे भरण्यात येत असून , यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये 04 , पुणे विभाग 05 , ठाणे 08 ,नाशिक विभाग 06 , कोल्हापूर 04 , नागपूर 10 ,अमरावती 10 तर लातुर विभागांमध्ये 06 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र संक्रमण परिषद मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 !
पात्रता – लिपिक या पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी धारक असणे आवश्यक आहे तर सहाय्यक अधिक्षक पदांकरीता उमदेवार हा किमान द्वितीय श्रेणीमधील पदवी ( विधाी शाखेतील पदवी धारक उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल ) त्याचबरोबर तीन वर्षांचा अनुभवा असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक 31 मार्च 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे , यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://ibpsonline.ibps.in/campmar23/ या संकेतस्थळावर दिनांक – 20 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे . या पदभरतीसाठी उमदेवारांकडून 720/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे , यामध्ये मागासवर्गीय /दिव्यांग / माजी सैनिक उमेदवारांना 650/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा