महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागांमध्ये सरळसेवा कोट्यातील , तब्बल 5,570 पदांसाठी मेगाभरती जाहीरात प्रसिद्ध !

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागांमध्ये सरळसेवा कोट्यातील तब्बल 5 हजार 570 पदांसाठी पदभरती प्रक्रिया संदर्भात जलसंपदा विभागाकडून पदनिहाय रिक्त पदांचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . सदर रिक्त पदांवर सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत सदस्य सचिव समन्वय समिती यांना आदेशित करणेबाबतचा पदभरती परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभागाच्या दि.31.10.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळसेवा कोट्यातील संवर्ग क मधील रिक्त पदांवर 100 टक्के क्षमतेने पदभरती करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .या निर्णयानुसारच जलसंपदा विभागातील रिक्त असणाऱ्या पदांवर 100 टक्के क्षमतेने पदभरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आला आहे .

यामध्ये संवर्ग ब मधील एकुण 1076 पदे रिक्त आहेत तर संवर्ग क मधील एकुण 4 हजार 494 पदे रिक्त आहेत . संवर्ग ब मध्ये कनिष्ठ अभियंता , वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक तर संवर्ग क मध्ये लघुलेखक , भू – वैज्ञानिक सहाय्यक , आरेखक , सहाय्यक आरेखक , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक , सहाय्यक ग्रंथपाल , कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक , कालवा निरीक्षक ,दप्तर कारकून अशा पदांकरीकरता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यास राज्य शासनांकडून अंतिम स्वरुप देण्यात आलेले असून , खाजगी कंपनीमार्फत पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे , याकरीता परीक्षा शुल्क म्हणून उमेदवारांकडून आवेदन करताना फीस आकारली जाणार आहे .

जलसंपदा विभागाकडून निर्गमित करण्यात आलेली सविस्तर मेगाभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

पदभरती जाहिरात

Leave a Comment