खुशखबर : महाराष्ट्र जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील तब्बल 5,570 पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया !

Spread the love

महाराष्ट्र शासन सेवेतील रिक्त पदांवर विभागनिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . पदनिहाय रिक्त पदांची संख्या व सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील संवर्ग क मधील नामनिर्देशनाची रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया  राबविण्यात बाबत जलसंपदा विभागाकडून दि.03.04.2023 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

सदर परिपत्रकान्वये जलसंपदा विभागांमध्ये सरळसेवा पद्धतीने भरावयाचा रिक्त पदांचा तपशिल नमुद करण्यात आलेला आहे . यामध्ये गट ब संवर्गातील अराजपत्रित पदांची एकुण 1076 पदे रिक्त् आहेत . यामध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य /यांत्रिकी / विद्युत व यांत्रिकी ) , वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांचा समावेश आहे .

तर गट क संवर्गामध्ये निन्मश्रेणी लघूलेखक , भू वैज्ञानिक सहाय्यक , कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक , आरेखक , सहाय्यक आरेखक , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक , अनुरेखक , प्रयोगशाळा सहाय्यक , सहाय्यक ग्रंथपाल , सहाय्यक भांडारपाल , कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक , दप्तर कारकुन , मोजणीदार , कालवा निरीक्षक अशा पदांच्या तब्बल 4,494 रिक्त पदांचा समावेश आहे .सरळसेवा पद्धतीने पदभरती करावयाचे गट ब ( अराजपत्रित पदे ) व गट क संवर्गातील एकुण 5,570 पदांसाठी पदभरती राबविण्याबाबत तपशिल जाहीर करण्यात आलेला आहे .

जाहिरात पाहा

Leave a Comment