महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये पदभरती प्रक्रियेस अखेर सुरुवात झाली आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेच्या वनविभागामध्ये विविध पदांच्या गट ब व क संवर्गातील तब्बल 2,417 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत .पदांचे नाव ,पदसंख्या, आवश्यक पात्रता या संदर्भातील सविस्तर पद भरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहूयात ..
पदांचे नाव / पदसंख्या : यामध्ये गट ब संवर्गातीलराज्यस्तरीय अराजपत्रित पदामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी पदांच्या 13 जागा , लघुलेखक (निम्र श्रेणी ) पदांच्या 23 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) पदांच्या 08 जागा , तर राज्यस्तरीय गट क संवर्गातील पदामध्ये वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदांच्या 05 जागा, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदांच्या 05 जागा असे वन विभागातील राज्यस्तरीय पदे भरण्यात येणार आहेत .
प्रादेशिक विभाग : वनविभागातील प्रादेशिक पदामध्ये लेखापाल ( गट क ) एकूण 129 जागा , सर्वेक्षक पदांच्या एकूण 86 जागा ( गट ) तर वनरक्षक ( गट क ) पदांच्या एकूण 2138 असे एकूण 2,417 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
सदर वरील पदाकरिता सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10 जून 2023 ते दिनांक 30 जून 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . सदर वनविभागातील मेगा भरती प्रक्रियामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी मिळालेली आहे .
वनविभागाकडून सदर पद भरती प्रक्रिया संदर्भातील निर्गमित करण्यात आलेली सविस्तर पद भरती प्रक्रिया जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात पाहा.
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !