महाराष्ट्र राज्याच्या बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 3000 मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मंजुरी देणेबाबत राज्य शासनांच्या गृह विभागांकडून दिनांक 24 जुलै 2023 रोजी पदभरती शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांची 40623 पदे मंजुर आहेत . यापैकी पोलिस शिपाई संवर्गाची सुमारे 10,000 पदे रिक्त असून , मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळ सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्यांकरीता अपुरे पडत आहे . शासन निर्णय दि.21 जानेवारी 2021 नुसार बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयासाठी 7,076 पोलिस शिपाई संवर्गातील व पोलिस चालक संवर्गातील 994 पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरु असलेली 7076 पदे वगळल्यानंतरही आयुक्तालयात सुमारे 3,000 पदे रिक्त आहेत . तसेच सदर अंमलदार हे भरती प्रक्रिया व प्रशिक्षण पुर्ण होवून प्रत्यक्ष कर्तव्यासाठी 02 वर्षांनंतर आयुक्तालयास उपलब्ध होणार आहेत .
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयासाठी पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पुर्ण होईपर्यंत पोलिस किमान 11 महिने कालावधीसाठी एकुण 3000 मनुष्यबहाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्याची विनंती पोलिस आयुक्त बृहन्मुंबई यांनी संदर्भाधीन पत्रान्वये शासनाकडे केली आहे . या विनंतीनुसार बृहन्मुंबई पोलिस आयुक्ताल अंतर्गल पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पुर्ण होईपर्यंत किमान 11 महिन्यांकरीता एकुण 3000 मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मान्यता देण्याची बाबत शासनाच्या विराधीन होती .
यानुसार आता बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयासाठी तातडीने मनुष्यबळाची आवश्यकता विचारात घेता , बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय अंतर्गत पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याच्या कार्यवाहीसाठी लागणारा पदभरतीचा कालावधी किंवा बाह्ययंत्रणेद्वारे प्रत्यक्ष मनुष्यबळ उपलब्ध झाल्यापासून 11 महिने या पेकी जो कमी असेल त्या कालावधीसाठी एकुण 3000 मनुष्यबळाच्या सेवा बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयासाठी बाह्य यंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहेत .
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !