बँक नोट प्रेस मुद्रणालय मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Bank Note Press Under Security Printing and Mintiong Corporation of Indai Recruitment for Various Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पर्यवेक्षक ( मुद्रण ) पदांच्या एकुण 08 जागा , पर्यवेक्षक (नियंत्रण ) पदांच्या 03 जागा , पर्यवेक्षक ( आयटी ) पदांच्या 01 जागा , कनिष्ठ कार्यालय सहाय्यक पदांच्या 04 जागा , कनिष्ठ तंत्रज्ञ ( मुद्रण ) पदांच्या 27 जागा , कनिष्ठ तंत्रज्ञ ( नियंत्रण ) पदांच्या एकुण 45 जागा , कनिष्ठ तंत्रज्ञ ( इन्क फॅक्टरी – अटेंडंट ऑपरेटर / केमिकल प्लांट / लॅब असिस्टंट ( केमिकल प्लांट / मशिनिस्ट ग्राईंडर / इन्स्टुमेंट / मेकॅनिक पदांच्या 15 जागा .
तसेच कनिष्ठ तंत्रज्ञ ( मेकॅनिकल / एसी ) पदांच्या एकुण 03 जागा तसेच कनिष्ठ तंत्रज्ञ ( इलेक्ट्रिकल / आयटी ) पदांच्या 04 जागा , तसेच कनिष्ठ तंत्रज्ञ ( नागरी / पर्यावरण ) पदांच्या 01 जागा अशा एकुण 111 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
वयोमर्यादा : वरील सर्व पदांकरीता दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे तसेच यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/bnpdjun23/ या संकेतस्थळावर दिनांक 21 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 600/- रुपये तर मागास प्रवर्गाकरीता 200/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !