महाराष्ट्र राज्य पोलिस दल पुणे ग्रामीण मध्ये पोलिस शिपाई , चालक पदांच्या 496 जागेसाठी महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्य पोलिस दल पुणे ग्रामीण मध्ये पोलिस शिपाई व चालक पदांच्या एकुण 496 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Police , Pune Rural Recruitment For Police Constable & Driver Post , Number of Post Vacancy – 496 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पोलिस शिपाई448
02.पोलिस शिपाई चालक48
 एकुण पदांची संख्या496

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर पोलिस शिपाई चालक पदांकरीता वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : पुणे येथे विधी अधिकारी , लिपिक , शिपाई , ग्रंथपाल , सफाईगार , प्रोफेसर इ.पदांसाठी मोठी पदभरती !

शारिरीक पात्रता : पुरुष उमेदवारांसाठी किमान 165 से.मी तर महिला उमेदवारांसाठी किमान 155 से.मी उंची असणे आवश्यक असणार आहेत . तर पुरुष उमेदवारांसाठी छाती ही 79 से.मी तर 5 से.मी फुगवता आली पाहिजे .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे www.policerecruitment2024.mahait.org  आणि www.mahapolice.gov.in  या संकेतस्थळावर दिनांक 05 मार्च 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment