GDS : महाराष्ट्र डाक विभाग सर्कल मध्ये ग्रामीण डाकसेवक पदांसाठी मेगाभर्ती 2023 ,लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय टपाल विभागांच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये डाकसेवक पदांच्या तब्बल 620 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Post Office Maharashtra Circle ,  Recruitment For Gramin Dak Sevak Post ,Number Of Post Vacancy – 620 ) सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात –

पदनाम व पदसंख्या : महाराष्ट्र ग्रामीण डाकसेवक सर्कल मध्ये , शाखा पोस्ट मास्टर ( Branch Post Master ) व सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर ( Assistant Branch Post Master ) पदांच्या एकुण 620 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Branch Post Master & Assistant Branch Post Master , Number of Post Vacancy – 620 )

पात्रता / वयोमर्यादा  – वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हा इयत्ता दहावी ( माध्यमिक शालांन्त बोर्ड परीक्षा ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवारांस संगणकाचे मुलभुत ज्ञान ( MSCIT / CCC ) कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.11.06.2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : महाराष्ट्र तलाठी मेगाभर्ती नवीन जाहिरात , वेळापत्रक जाहीर !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.11 जून 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता अर्ज सादर करण्यासाठी 100/- तर मागास प्रवर्गातील व अपंग / महिला उमेदवारांकरीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment