शिक्षक , लिपिक,भांडारपाल , अधिक्षक / अधिक्षिका ,शिपाई , परिचर चालक इ. शिक्षक -शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी मेगाभरती !

Spread the love

विशात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण यांच्या आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल , कोकमठाण येथे विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Atma Malik Education And Sport Sankul Kokamtham , Recruitment For Various Teaching And Non Teaching Staff ) पदनाम , रिक्त पदसंख्या व आवश्यक पात्रता याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदांचे नाव – शिक्षक , लिपिक , शिपाई , संगित शिक्षक , संगणक शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , शारीरीक शिक्षण शिक्षक , समन्वयक , फोटोग्राफर , स्टेनोग्राफर , अकौंटेंट / क्लर्क , इंटर्नल ऑडीटर ,डान्स टिचर , वसतिगृह शिक्षक , अधिक्षक , अधिक्षिका , मदतनिस , हॉस्टेल इन्चार्ज , माळी , स्वच्छता कर्मचारी , सह सुपरवायझर , टॉईलेट स्वीपर , संगणक ऑपरेटर , क्रिडा प्रशिक्षक ,वायरमन , पेंटर , पाणीपुरवठा कर्मचारी , गवडी , फिल्टर ऑपरेटर इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

पात्रता – यांमध्ये शिक्षक या पदांकरीता सबंधित शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसचे लिपिक पदांकरीता उमदेवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर टायपिंग पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर प्रयोगशाळा सहाय्यक या पदांकरीता उमेदवार हा B.SC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .गोडाऊन किपर या पदांसाठी उमदेवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया – सदर पदभरती करीता थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून , जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी कोकमठाण पुरणगाव , येवला शहापुर जऊळके ( दिंडोरी ) , अंभई -वाडा येथे दि.25 मे ते 31 मे 2023 या कालावधीमध्ये सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सर्व कागतपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment