राज्यातील मुंबई , पुणे , नागपुर , छ.संभाजीनगर कारागृह विभागांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या 1800 जागांसाठी महाभरती ;

Spread the love

राज्यातील मुंबई , पुणे , नागपुर व छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या तब्बल 1800 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Prison Department Recruitment For Prison Constable Post , Number of Post Vacancy – 1800 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रकारागृह विभागकारागृह पोलिस शिपाई पदांची संख्या
01.छत्रपती संभाजी नगर315
02.नागपुर355
03.पश्चिम विभाग पुणे513
04.मुंबई717
 एकुण पदांची संख्या1800

वयोमर्यादा : कारागृह पोलिस शिपाई या पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 31 मार्च 2024 मार्च किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये सरळसेवा पद्धतीने ग्रेड I आणि ग्रेड III पदांच्या 9,144 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ! 

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : कारागृह पोलिस शिपाई या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

शारीरिक पात्रता : सदर पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची ही 165 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तसेच छाती 79 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .तर महिला उमेदवारांकरीता किमान उंची ही 155 से.मी असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx# या संकेतस्थळावर दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment