सरकारी नोकरीची शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर समोर आली आहे . ती म्हणजे महाराष्ट्र शासन सेवेत तब्बल 145,000 पदांसाठी सर्वात मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यापुर्वी राज्य शासन सेवेत 75,000 पदे भरण्याचा निश्चय राज्य शासनांकडून करण्यात आलेला होता . आता यांमध्ये वाढ करुन तब्बल 145,000/- पदांवरी पदभरती प्रक्रिया राबविण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 1 लाख 45 हजार पदांवर पदभरती करण्याची मागणी संबंधित विभागांकडून करण्यात आलेली आहे . कारण रिक्त पदांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे शिवाय रिक्त पदांवर कंत्राटी व रोजंदारी पद्धतीने पदे भरण्यात आलेली आहेत , सदर पदांवर कायम पद्धतीने पदभरतीची मागणी विभगांकडून करण्यात येत आहे .
महाराष्ट्र शासनांचे मा. मुख्यमंत्री यांच्य अध्यक्षतेखाली मंगळवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये पदभरती प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला यांमध्ये रिक्त पदांपैकी वर्ग ब , क व ड संवर्गातील तब्बल 75 हजार पदे ही माहे ऑगस्ट महीन्यांपूर्वी भरण्याचा मोठा निर्णय या बैठकींमध्ये घेण्यात आला आहे .
सदर पदभरती पैकी सध्या प्रत्यक्षात 6 हजार 499 पदे भरण्यात आलेली आहे तर 47 हजार पदभरती प्रक्रियासाठी टीसीएस व आबीपीएस कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे . तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत एकुण 8169 वर्ग ब व क संवर्गातील पदांसाठी दि.30 एप्रिल 2023 रोजी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे .
- वखार महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 122 रिक्त जागेसाठी पदभरती !
- नाशिक पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 114 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नाशिक येथे कार चालक , शिपाई , बस चालक , चौकीदार , माळी इ. पदांसाठी पदभरती !
- मुंबई येथे लिपिक व शिपाई पदाच्या 27 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !