महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागांमध्ये 8000+ पदे रिक्त आहेत . यापैकी वर्ग क संवर्गा मध्ये 4075 जागा रिक्त आहेत .सदर रिक्त पदांवर पदभरती राबविण्याकरीता जलसंपदा विभागाकडुन दि.27 जानेवारी 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या पदभरती संदर्भातील जलसंपदा विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहुयात …
राज्यातील प्रोदशिक स्तरावर वेगवेगळी भरती प्रक्रिया न राबविता जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयांतील गट – क संवर्गातील नामनिर्देशनाची रिक्त पदे भरण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे .जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील गट – क संवर्गातील नामनिर्देशनाची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेसाठी शासनाकडुन नेमण्यात आलेल्या एजन्सीसोबत या समन्वय समितीकडून सामंजस्य करार करण्यात येणार आहे .
यापैकी लिपिक टंकलेखन पदांची पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार असून , उर्वरित पदे ही सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत .
परिक्षार्थींकडून परिमंडळनिहाय व पदनिहाय याप्रमाणे विकल्प घेण्यात येणार आहेत .तसेच समन्वय निवड समितीकडुन परीक्षा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर , निवड झालेल्या परीक्षार्थींना गुणवत्तेनुसार त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार परिमंडळांतर्गत वाटप करण्यात येणार आहे .त्यानंतर परिमंडळ मंडळाकडून पदनियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे .
या समन्वय समितीकडुन भरती प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भविल्यास , संबंधित प्रादेशिक निवड समितीकडून अशी न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यात येणार आहेत . सदर पदभरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- AIASL : भारतीय हवाई सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1067 जागेसाठी महाभरती .
- PM Intenrship : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..