राज्य शासन सेवेमध्ये अभियंता , निरीक्षक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये अभियंता , निरीक्षक , लिपिक , चालक तसेच शिपाई पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2109 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या 587 जागा , कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ पदांच्या 05 जागा , तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या 1378 जागा , लघुलेखक ( उच्च श्रेणी ) पदांच्या 08 जागा , तर लघुलेखक ( निम्न श्रेणी ) पदांच्या 02 जागा , उद्यान पर्यवेक्षक पदांच्या 12 जागा , सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ पदांच्या 09 जागा , तर स्वच्छता निरीक्षक पदांच्या 01 जागा ..

तर वरिष्ठ लिपिक पदांच्या 27 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 05 जागा , वाहन चालक पदांच्या 02 जागा , स्वच्छक पदांच्या 32 जागा तर शिपाई पदांच्या 41 जागा अशा एकुण 2,109  जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : BOM : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये राज्यात 100 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता : अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा / 10 वी / 12 वी / टायपिंग पात्रता / कोणतीही पदवी , 07 वी / वाहन चालविण्याचा परवाना / टंकलेखन मराठी / इंग्रजी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

वयोमर्यादा : सदर वरील सर्व पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वयांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीत नमुद केलेली अर्हता धारण करणारे उमेदवार हे आपले अर्ज http://mahapwd.gov.in/ या वेबसाईटवर दिनांक 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .या भरती करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / आदुघ / दिव्यांग उमेदवारांकरीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment