महाराष्ट्र राज्यात बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत तब्बल 100 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank Of Maharashtra Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 100 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.क्रेडिट ऑफिसर स्केल – II : पदांच्या एकुण 50 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्के सुट देण्यात येईल . तसेच MBA / PGDBA / CA / CFA / ICWA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.क्रेडिट ऑफीसर स्केल -III : क्रेडिट ऑफीस स्केल III पदांच्या 50 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्के सुट देण्यात येईल . तसेच MBA / PGDBA / CA / CFA / ICWA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत
आवश्यक वयोमर्यादा : यांमध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी पद क्र.01 करीता किमान वय हे 25 वर्षे तर कमाल वय हे 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.02 करीता किमान वय हे 25 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/ या संकेतस्थळावर दिनांक 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 1180/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 118/- रुपये परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026