राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गट क व ड संवर्गातील 10,949 जागांसाठी महाभरती , या तारखेपर्यंच करता येणार आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक विभागामार्फत गट क व गट ड संवर्गातील तब्बल 10,949 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांना आवेदन सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल  पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट क संवर्गामध्ये – गृहवस्त्रपाल -वस्त्रपाल , भांडारपाल नि वस्त्रपाल , प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , अभिलेखापाल , आरोग्य पर्यवेक्षक , वीजतंत्री , कुशल कारागीर , वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक , वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक , कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक , रक्तपेढी अधिकारी , औषध निर्माण अधिकारी , आहारतज्ञ , दंत आरोग्यक , सांखिकी अन्वेक्षक , कार्यदेशक , सेवा अभियंता , वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक , वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता / समाजसेवा अधिकक्षक , अधिपरिचारिका , दंत यांत्रिकी , दूरध्वनीचालक , वाहनचालक , सुतार

नेत्र चिकित्सा अधिकारी , भौतिकोपचार तज्ञ , व्यवसायोपचार तज्ञ  , समोपदेष्टा , रासायनिक सहाय्यक , अणुजीव सहाय्यक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ , अवैद्यकीय सहाय्यक , वार्डन / गृहपाल , तंत्रज्ञ , ग्रंथपाल , वीजतंत्री , शस्त्रक्रियागृह सहाय्यक , मोल्डरुम तंत्रज्ञ , बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी, कनिष्ठ पर्यवेक्षक इत्यादी गट क संवर्गातील 6,939 पदांकरीता पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : MTS , कार्यालय सहायक , माळी , धोबी इ. पदांसाठी मोठी पदभरती .

गट ड संवर्गांमध्ये – गड ड संवर्गात शिपाई , कक्षसेवक , बाह्यरुग्ण सेवक , अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर , रक्तपेढी परिचर , दंत सहाय्यक , मदतनिस , नियमित क्षेत्र कर्मचारी ( इतर ) , नियमित कर्मचारी ( हंगामी ) , अकुशल कारागीर इ. गट ड संवर्गातील पदांच्या तब्बल 4,010 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दि.22.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

हे पण वाचा : भारत सरकार मिंट हैद्राबाद येथे विविध पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !

आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग करीता – 1,000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / आर्थिक दृष्ट्या मागास घटक प्रवर्ग करीता 900/- रुपये तर माजी सैनिक करीता फीस नाही ..

गटनिहाय सविस्तर पदभरती जाहीरात / अर्ज प्रक्रिया / शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

गट क संवर्ग करीता – जाहिरात पाहा

गट ड संवर्ग करीता – जाहिरात पाहा

Leave a Comment