केंद्र सरकारच्या अधिनस्त हेड क्वार्टर पुणे , मुंबई , देवळाली आणि नगर येथे विविध गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्र सरकारच्या अधिनस्थ हेड क्वार्टर पुणे , मुंबई , देवळाली आणि अहमदनगर येथे विविध गट क संवर्गातील पदांच्या 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Government Southern Command Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -24 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.MTS ( दुत )13
02.MTS ( कार्यालयीन दप्तरी कामकाज )03
03.स्वयंपाकी02
04.धोबी02
05.मजदुर03
06.माळी01
 एकुण पदांची संख्या24

आवश्यक अर्हता : यांमध्ये स्वयंपाकी या पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत , तर उर्वरित इतर सर्व पदांकरीता उमेदवार हे फक्त 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गट क व ड संवर्गातील 10,949 जागांसाठी महाभरती , या तारखेपर्यंच करता येणार आवेदन !

वयोमर्यादा : वरील सर्व पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 08.10.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे असणे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment