DTP MAHARASHTRA :  महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग मध्ये तब्बल 125 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये तब्बल 125 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीत आवश्यक अर्हता धारक करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government of Maharashtra Directorate of Town Planning And Department Recruitment For Peon Post , Number of Post Vacancy – 125 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये गट ड संवर्गातील शिपाई या पदांच्या तब्बल 125 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , विभागनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रविभागाचे नावपदसंख्या
01.नागरपुर19
02.अमरावती10
03.नाशिक09
04.पुणे48
05.कोकण28
06.छ.संभाजीनगर11
 एकुण पदांची संख्या125

हे पण वाचा : जनता नागरी सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रकिया ! लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता / वयोमर्यादा : सदर शिपाई या पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रवर्ग / खेळाडू / आर्थिक दृष्ट्या मागास / अनाथ उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्‍क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/EForms/ पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment