PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये गट ड संवर्गातील पदांसाठी सरळसेवा पद्घतीने महाभरती , Apply Now !

Spread the love

पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PCMC Recruitmernt For Firement Post , Number of Post Vacancy – 150 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्कयुअर ( Fireman / Fireman Rescuer ) पदांच्या एकुण 150 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच 06 महिने अग्निशमन प्रशिक्षण कार्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : केंद्रीय सैनिकी शाळा नाशिक येथे अध्यापन कर्मचारी , शिक्षकेत्तर कर्मचारी , शिपाई , चालक , बागकाम , सफाई कर्मचारी इ. पदांसाठी मोठी पदभरती .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 17 मे 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग / अनाथ करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

शारीरिक पात्रता :

 पुरुषमहिला
उंची165 सेमी162 सेमी
छाती81 सेमी + 05 सेमी
वजन50 कि.ग्रॅम50 कि.ग्रॅम

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php या संकेतस्थळावर दिनांक 26 एप्रिल 2024 पासुन ते दिनांक 17 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment