महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध वर्ग अ , ब व संवर्ग ब कनिष्ठ स्तर संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( MSRTC Recruitment For Class A , B & C Post , Number of Post Vacancy – 65 ) पदनाम पदांची संख्या अर्हता पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये वर्ग -1 संवर्गात यंत्र अभियंता पदांच्या 11 जागेसाठी भरती राबविली जात असून , वर्ग -2 संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिकारी / आगार व्यवस्थापक ( वरिष्ठ ) ( वाहतुक ) पदांच्या 08 जागा ,उप यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक ( वरिष्ठ ) ( यांत्रिकी ) पदांच्या 12 जागा , लेखा अधिकारी / लेखा परिक्षण अधिकारी पदांच्या 02 जागा , भांडार अधिकारी पदांच्या 02 जागा असे संवर्ग 02 मधील 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया येत आहे .
तर संवर्ग – 2 मधील कनिष्ठस्तर संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक ( वाहतुक ) पदांच्या 12 जागा , सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थाक ( यांत्रिक ) पदांच्या 09 जागा , सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी पदांच्या 02 जागा , तर विभागीय सांख्यिकी अधिकारी पदांच्या 07 जागा अशा वर्ग 01 , वर्ग 02 व संवर्ग ब कनिष्ठ स्तर मिळून एकुण 65 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | यंत्र अभियंता वर्ग 1 | 11 |
| 02. | विभागीय वाहतुक अधिकारी वर्ग -2 | 8 |
| 03. | उप यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक | 12 |
| 04. | लेखा अधिकारी / लेखा परिक्षण | 02 |
| 05. | भांडार अधिकारी | 02 |
| 06. | विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक ( वाहतुक ) | 12 |
| 07. | सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक ( यांत्रिक ) | 09 |
| 08. | सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी | 02 |
| 09. | विभागीय सांख्यिकी अधिकारी | 07 |
| एकुण पदांची संख्या | 65 |
पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता, इतर अटी व शर्ती तसेच वेतनमान तसेच आवेदन प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहितीकरीता खालील जाहीरात पाहावीत .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !