MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट अ व ब संवर्गाकरीता आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट अ व गट ब संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 66 ) पदनाम पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये गट अ संवर्गात सहसंचालक , सामान्य राज्य सेवा पदांच्या 04 जागा , उपसंचालक , सामान्य राज्य सेवा  पदांच्या 34 जागा , सहाय्यक प्रारुपकार – नि – अवर सचिव पदांच्या 03 जागा , वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी , सामान्य राज्य सेवा पदांच्या 02 जागा अशा पदांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

तर गट ब संवर्गांमध्ये सहाय्यक संचालक पदांच्या 02 जागा , उप अभिरक्षक पदांच्या 01 जाग , सहयोगी प्राध्यापक पदांच्या 04 जागा , प्राध्यापक पदांच्या 12 जागा , तंत्रशिक्षण सहसंचालक / संचालक पदांच्या 02 जागा , सहायक सचिव ( तांत्रिक ) पदांच्या 02 जागा अशा एकुण 66 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : राज्यात सरकारी , निमसरकारी , खाजगी संस्थेमध्ये विविध पदांच्या तब्बल 1520 जागांसाठी मोठी पदभरती !

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहसंचालक गट अ04
02.उपसंचालक गट अ34
03.सहाय्यक प्रारुपकार – नि-अवर सचिव गट अ03
04.वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी गट अ02
05.सहाय्यक संचालक गट ब02
06.सहयोगी प्राध्यापक04
07.तंत्रशिक्षण सहसंचालक / संचालक02
08.सहायक सचिव02
09.उप अभिरक्षक गट ब01
10.प्राध्यापक12
 एकुण पदांची संख्या66

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 11 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 719/- रुपये तर मागास प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 449/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment