पोलिस शिपाई पदांच्या 14,000 रिक्त जागांपैकी 7,000 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया 15 सप्टेंबर पासुन सुरु ! जिल्हानुसार रिक्त पदे पाहा .

Spread the love

महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये तब्बल 14,000 जागा रिक्त आहेत .यापैकी पहिल्या टप्यांमध्ये 7,000 जागांसाठीची पदभरती प्रक्रिया 15 सप्टेंबर 2022 पासुन सुरु करण्यात येणार आहे . रिक्त जागांपैकी 50% रिक्त जागांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , जिल्हानुसार रिक्त जागांची माहीती पोलिस प्रशासनाकडुन प्रदर्शित करण्यात आलेली आहे . याबातची जिल्हानिहाय रिक्त जागांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रजिल्ह्याचे / आयुक्तालयाचे नावरिक्त जागांची संख्या
01.अहमदनगर139
02.बुलढाणा117
03.पालघर114
04.गडचिरोली415
05.मुंबई रेल्वे पोलिस505
06.नवी मुंबई358
07.मिरा भाईंदर505
08.सोलापुर ग्रामीण145
09.जळगाव154
10.नागपुर शहर153
11.नागपुर ग्रामीण108
12.पुणे ग्रामीण158
13.पुणे शहर182
14.ठाणे शहर158
15.मुंबई शहर1431

उर्वरित जिल्हामध्ये 100 पेक्षा कमी पदे रिक्त आहेत .सदर वरील तक्त्यामध्ये नमुद रिक्त जागांची संख्या महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत्त संकेतस्थळावर www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर नमुद करण्यात आलेली आहे . इतर जिल्हांची रिक्त पदे पाहण्यासाठी या संकेतस्थळावर क्लिक करुन सविस्तर रिक्त पदांचा अहवाल पाहु शकता .सदर नमुद रिक्त पदांकरीता पदभरती प्रक्रिया दि.15 सप्टेंबर पासुन करण्यात येणार असल्याने , राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र पोलिस दलामध्ये नोकरीची मोठी संधी मिळणार आहे .

Leave a Comment