महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये तब्बल 5347 जागेसाठी महाभरती, अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ ..

Spread the love

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये तब्बल 5,347 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( Mahavitaran Company Limited Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये विद्युत सहाय्यक पदांच्या 5,347 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय अथवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित करण्यात आलेली 02 वर्षांची वीजतंत्री / तारतंत्री पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : IBPS मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 4455 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/  या संकेतस्थळावर दि .16.08.2024 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 250/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ /अनाथ प्रवर्ग करीता 125/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment