RRB : भारतीय रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 7,951 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Railway Recruitment Board , Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 7951 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | केमिकल सुपरवाइजर / संशोधन | 17 |
| 02. | मेटलर्जिकल सुपरवाइजर / संशोधन | |
| 03. | कनिष्ठ अभियंता | 7934 |
| 04. | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| 05. | केमिकल व मेटलर्जिकल सहाय्यक | |
| एकुण पदांची संख्या | 7951 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : केमिकल टेक्नॉलॉजी पदवी उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : मेटलर्जिकल अभियंता पदवी
पद क्र.03 साठी : संबंधित विषय / ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.04 साठी : कोणत्याही विषयामधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.05 साठी : 45 टक्के गुणांसह बी.एस्सी ( भौतिकशास्त्र / रसायन शास्त्र विषयांसह )
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 36 वर्षे दरम्यान आवश्यक असेल , तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले ओवदन हे https://www.rrbmumbai.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 जुलै 2024 पासुन ते दिनांक 29 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला / आ.दु.घ तसेच तृतीयपंथी उमेदवारांकरीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026