महिला बाल विकास विभाग योजनेअंतर्गत शासन देत आहे महिलांना पिठाच्या गिरणी वरती 100% अनुदान . अर्ज प्रक्रिया सुरु !

Spread the love

सर्व नागरिकांना नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो आज आपण शासनाने राबवलेल्या एका महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ती योजना आहे मोफत पिठाची गिरण घेण्यासाठी शासन देत आहे अनुदान, आणि महत्वाचे म्हणजे ह्या योजनेसाठी सध्या अर्ज सुरू झालेले आहेत. मोफत पिठाची गिरण अनुदान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो, तो अर्ज कोठे करावा? यासोबत हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने? अर्ज करत असताना कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतील आणि या योजनेचा लाभण नक्की कोण कोण घेऊ शकेल? या संदर्भातील संपूर्ण माहिती म्हणजेच या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण अगदी डिटेल्स मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा आणि आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करावा.

मोफत पिठाची गिरण अनुदान या योजनेअंतर्गत शासन शंभर टक्के अनुदानावरती मोफत पिठाची गिरणी देत आहे. म्हणजेच पिठाच्या गिरणीवरती 100% अनुदान शासन देत आहे. राज्यामध्ये खेडेगावातील महिलांना, यासोबतच रोजगार करणाऱ्या महिलांना चांगला रोजगार मिळावा यासाठी सरकारने ही योजना ही मोहीम राबवण्याचे हाती घेतले आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

या योजनेसाठी पात्रता काय असेल यासोबतच इतर माहिती

१) महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत मोफत पिठाची गिरण ही योजना राबवली जात आहे .या योजनेच्या माध्यमातून गरीब वर्गातील कुटुंबातील महिलांना लाभ दिला जातो.

२) या योजनेच्या माध्यमातून ज्या कोणी महिला लाभार्थी असतील त्यांना पिठाच्या गिरणीवर शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे.

३) यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे शासनाकडे अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

४) या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला घरबसल्या पिठाची गिरण चालवून चांगला रोजगार मिळू शकतात व आपली आर्थिक प्रगती साधू शकतात.

५) या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 59 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात.

मोफत पिठाची गिरण या योजनेचा महत्वाचा उद्देश

  • राज्यांमधील ज्या काही महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोफत पिठाची गिरण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेमागचा महत्त्वाचा उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाला एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल व ते कोणतेही धावपळ न करता घरबसल्या गिरण चालवून चांगली कमाई करू शकतील.
  • तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये ज्या काही अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाईल.
  • आणि त्यांना शंभर टक्के अनुदानावरती मोफत पिठाची गिरण दिली जाणार आहे.
  • त्यासाठी अर्जाची प्रक्रिया चालू आहे. विहित नमुन्यातील अर्ज हा पंचायत समितीमध्ये भरून जमा करायचा आहे.
  • अर्ज नमुना कसा असतो याची पीडीएफ आपण खाली दिलेली आहे, खालील दिलेल्या पीडीएफ फाईल वरती क्लिक करून तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता. त्याची प्रिंट काढून तो अर्ज व्यवस्थितपणे भरायचा आहे आणि हा विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल

योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

१) ज्या महिला अर्ज करणार असतील त्या बारावी पास असाव्यात आणि त्याच्या पुरावा अर्ज सोबत जोडलेला असावा

२) अर्जदार महिलेचे आधार कार्ड

३) अर्जदार महिलेचा विहित नमुन्यातील अर्ज

४) घराचा आठ अ उतारा

५) अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न आहे वार्षिक एक लाख वीस हजार पेक्षा कमी असावे याचा पुरावा तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा

६) बँक पासबुक मधील पहिल्या पानाची झेरॉक्स

७) लाईट बिल चे झेरॉक्स

वरील सर्व कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे अर्ज सोबत जोडायचे आहेत आणि अर्ज हा च व्यवस्थितपणे वाचून त्यामध्ये संपूर्ण माहिती भरायचे आहे. माहिती भरून झाल्यानंतर व कागदपत्रे अर्जाला जोडल्यानंतर हा विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल करायचा आहे.

अर्ज नमुना

Leave a Comment