MSF : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ,कफ परेड मुख्यालय , मुंबई येथील विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक पदांच्या एकुण 10 जागा रिक्त आहेत .सदरची पदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबतची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे एक राज्य शासनाचे वैधानिक महामंडळ आहे .या महामंडळ अंतर्गत राज्यातील सरकारी दवाखाने , खाजगी बंदरे ,हॉटेल ,रेल्वे स्टेशन ,विशेष आर्थिक क्षेत्रे यांना सुरक्षा प्रदान करण्यात येते .सदर महामंडळ अंतर्गत जवान राज्यातील सर्व विभागामध्ये कार्यरत असुन , मुंबई मध्ये सदर महामंडळाचे मुख्यालय आहे .मुख्यालयामध्ये विविध विभामध्ये 10 कंत्राटी कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे .यासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

सदर पदासाठी मासिक वेतन 25,000/- दिले मानधन स्वरुपात दिले जाणार असुन , सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा किमान पदवीधारक असणे आवश्यक ,मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. तर इंग्रजी 40 श.प्र.मि परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

पात्र उमेदवारांना जाहीरातीमध्ये नमुद लिंकवर क्लिक करुन दि.10.10.2022 पर्यंत आपला अर्ज सादर करायचा आहे .अर्ज सादर केल्यानंतर पोचपावती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवावेत .पदभरती संदर्भात अधिक माहीती साठी खालील नमुद लिंकवर क्लिक करुन सविस्तर जाहीरात पाहा .

जाहिरात पाहा

Leave a Comment